Menu Close

बहराईच : श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या स्थापनेवरील वादातून धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ शंभूलाल यांची हत्या

योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. यासाठी सरकारने कठोरात कठोर पाऊले उचलायला हवीत !

बहराईच (उत्तरप्रदेश) : येथील बिबियापूर गावमध्ये २७ जुलै या दिवशी ६० वर्षीय हिंदुत्वनिष्ठ शंभूलाल यांची धर्मांधांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

गेल्या वर्षी येथे नवरात्रीच्या वेळी श्री दुर्गामातेची पूजा करण्यासाठी देवीची मूर्ती बसवण्यावरून धर्मांधांनी वाद घातला होता. शंभूलाल येथील नवदुर्गा पूजा समितीचे अध्यक्ष होते. त्या वादानंतरही शंभूलाल यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला, असे सांगण्यात येत आहे. २७ जुलैला याच विषयावरून येथील मालिक शेख उपाख्य सलीम याच्याशी वाद झाला. त्यानंतर रात्री शंभूलाल यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सलीम याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या तो पसार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *