Menu Close

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याला अटक

काँग्रेसची मानसिकताच हिंदुविरोधी आणि अन्य धर्मियांचे लांगूलचालन करण्याची राहिल्याने तिचे नेते आणखी काय करणार ? काँग्रेसच्या अशा नेत्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी हरियाणातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

कर्नाल (हरियाणा) : भगवान श्रीराम, रा.स्व. संघ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी हरियाणातील काँग्रेसचे नेते पंकज पुनिया यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. स्थलांतरित कामगारांच्या सूत्रावरून पुनिया यांनी ट्वीट करतांना हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. ट्वीटवरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी हे ट्वीट काढूनही टाकले होते.

याविषयी उत्तरप्रदेश सरकारनेही पुनिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी नेमके काय ट्वीट केले होते, हे समजू शकले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Read more on Anti Hindus

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *