Menu Close

भाजीसाठी पत्नीने ३० रुपये मागितले म्हणून पतीकडून तोंडी तलाक

  • अशा घटनांच्या वेळी देशातील महिला मानवाधिकार संघटना कुठे बेपत्ता होतात ?  
  • इस्लामसाठी चित्रपटांत काम करणे सोडणार्‍या अभिनेत्री झाहिरा वसीम यांची लगेच बाजू घेणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी हे तोंडी तलाकची झळ सोसाव्या लागणार्‍या मुसलमान महिलांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : पत्नीने भाजी विकत घेण्यासाठी पतीकडे ३० रुपये मागितले. याचा राग आल्याने पतीने तिच्यावर ‘स्क्रू ड्रायव्हर’ने आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या पत्नीच्या तोंडावर थूंकत पतीने तिला तोंडी तलाक दिला. जैनब असे या महिलेचे नाव असून तिने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. नंतर त्यास जामिनावर सोडण्यात आले. या दोघांचा विवाह ९ वर्षांपूर्वी झाला असून त्यांना ४ मुलेही आहेत. ‘विवाहापासूनच सासरच्या लोकांकडून जैनबचा छळ केला जात होता, तसेच तिला मारहाण केली जात होती’, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *