Menu Close

देशात जाती-धर्मात फूट पाडून वातावरण गलिच्छ करण्याचे प्रयत्न होत आहेत ! – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर

राजकीय अनागोंदीवर बोट ठेवणार्‍या नाना पाटेकर यांच्या विधानांविषयी सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नाशिक : देशातील राजकीय स्थिती डळमळीत झाली असून जाती-धर्मात फूट पाडून वातावरण गलिच्छ होत आहे, अशी उद्विग्नता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली. ते ‘आपला माणूस’ या चित्रपटाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले होते.

नाना पाटेकर पुढे म्हणाले, ‘‘काही राजकीय मंडळी तरुणांच्या बेरोजगारीचा अपलाभ घेत स्वत:ची पोळी भाजायचा प्रयत्न करत असून तरुणांच्या हे लक्षात यायला हवे. आजची सत्ताधारी मंडळी आणि काल असणारी हे सर्व सारखेच आहेत ! आज जे विरोधक आहेत, ते काल सत्ताधारी नव्हते का ? मग त्या त्या वेळी जनतेचा विचार अन् आंदोलने का केली नाहीत ?’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *