Menu Close

पाटलीपुत्र (पाटणा) येथील महाविद्यालयातील सरस्वती पूजेच्या कार्यक्रमात बारबालांचे अश्‍लील नृत्य

  • कधी अन्य पंथियांच्या कार्यक्रमात असा प्रकार झाल्याचे ऐकले आहे का ?
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचेच हे दुष्परिणाम आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पाटलीपुत्र : वसंत पंचमीनिमित्त येथील बी.एन्. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात काही बारबालांनी अत्यंत बीभत्स आणि अश्‍लील नृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला. याविषयीची व्हिडिओ क्लीप सर्वत्र फिरत आहे. या प्रकरणी कुलगुरू रासबिहारी सिंह यांनी चौकशीचा आदेश दिला आहे, तसेच पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुमार रवी यांनीही चौकशीचा आदेश दिला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *