Menu Close

ख्रिस्ती पाद्य्राच्या पुत्राकडून विवाहित महिलेवर बलात्कार !

या घटनेला दिव्याखाली अंधार म्हणायचे कि लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाणचा प्रकार ?

rape_victimभाग्यनगर (हैद्राबाद, तेलंगण) : येथील पहाडीशरीफ भागात एका ख्रिस्ती पाद्य्राच्या सॅमुएल नावाच्या पुत्राने २६ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ आठवड्यांपूर्वी घडली आहे; परंतु पीडित महिलेने १५ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांत याविषयी तक्रार केली.

१. २६ जानेवारी या दिवशी सॅमुएलने त्याच्या शेजारी रहाणार्‍या महिलेला एका निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस निरिक्षक वी.वी. चलापथी यांनी दिली.

२. पोलिसांनी या प्रकरणात सॅमुएलवर अपराध प्रविष्ट केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *