Menu Close

कायम बीफ खायचे? तर आम्हांला मत द्या – ओवेसी

हैदराबाद : हैदराबादचे खासदार असाद्दुदीन ओवेसी यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. एआयएमआयएमचे प्रमुख आपल्या पक्षाच्या प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत म्हणाले, की तुम्हांला जर यापुढे बीफ खायचे असेल तर आमच्या पक्षाला मत द्या.

जर एमआयएम या निवडणुकीत पराभूत झाली तर मी सांगतो अल्प संख्याक समाजाने बीफ खाणे विसरून जावे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

तसेच त्यांनी महाराष्ट्रातील भाजप प्रणित सरकारवर आरोप करताना सांगितले की, गरीब मुसलमान आणि दलित यांच्या विरोधात सरकार असून त्यांनी जाणून बुजून बीफ बंदी केली आहे.

संदर्भ : झी न्युझ

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *