
सांगली – सांगली येथे रणरागिणी शाखेच्या वतीने श्रीशिवप्रतिष्ठानच्या दौडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. शर्वरी रेपाळ आणि सौ. भारती बाडगी, तसेच सौ. उज्वला चौगुले, सौ. संगिता चौगुले, सौ. सरिता चौगुले, सौ. सुनिता लोहार, सौ. मधुरा तोफखाने उपस्थित होत्या. या प्रसंगी रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्, अशा घोषणा देण्यात आल्या, तर धारकर्यांनीही उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
क्षणचित्रे
१. रणरागिणी शाखेच्या फलक बघून दोन महिला स्वागतासाठी थांबल्या होत्या.
२. स्वागत करत असतांना पोलिसांनी छायाचित्र काढले !






