Menu Close

हिंदु गोवंश रक्षा समितीने ख्रिस्ती शाळेला परीक्षा रहित करून गोकुळाष्टमीची सुटी देण्यास भाग पाडले !

धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

हिंदूंनो, ख्रिस्ती शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! आणि आपल्या पाल्यांना ख्रिस्ती शाळांत घालायचे का ते ठरवा !

नालासोपारा, २४ ऑगस्ट : येथील ‘वेलंकनी प्री प्रायमरी स्कूल’ या ख्रिस्ती शाळेने गोकुळाष्टमीच्या दिवशी शाळेला शासनाचा अध्यादेश असूनही सुटी न देता उलट शाळेत परीक्षा ठेवली होती. याची माहिती हिंदू गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच हिंदू गोवंश रक्षा समितीने शाळेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आणि त्यांचे प्रबोधन केले. परिणामस्वरूप व्यवस्थापकांनी झालेली चूक मान्य करून परिक्षा रहीत करून शाळेला सुटी घोषित केली.

आरंभी व्यवस्थापकांनी निवेदन स्वीकारले नाही आणि स्वीकारल्याची प्रत देण्यासही नकार दिला. या वेळी या वेळी हिंदू गोवंश समितीचे सर्वश्री प्रसाद काळे, जयेश धोंडे, भालचंद्र नागटिळक, अमित कापसे, संतोष पांडे आणि दिप्तेश पाटील हे सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *