Menu Close

बिहार : मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी

Save_temple_M

सीवान (बिहार) : येथील एका मंदिरातून आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे.

येथील माथिया गावातील रामाच्या मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी भगवान राम, सिता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह एकूण सहा मूर्तींची चोरी केली.

चोरी झाली त्यावेळी मंदिरात पुजारी उपस्थित नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज (शनिवार) सकाळी ज्यावेळी पुजारी नेहमीप्रमाणे मंदिरात आले, त्यावेळी ही चोरी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

संदर्भ : सकाळ

 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *