Menu Close

(म्हणे) ‘प्रभु राम श्रीमंतांचे, तर महादेव गरिबांचे !’ – मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, तेलंगाणा

तेलंगाणातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे भाजपवर टीका करतांना हिंदूंमध्ये फूट पाडणारे विधान

नवी देहली – भाजपचे नेते ‘जय श्रीराम’ची घोषणा देतात तशी ‘हर हर महादेव’ची घोषणा का देत नाहीत? आम्ही (दक्षिण भारतीय) द्रविड आहोत, ते (उत्तर भारतीय) आर्य आहेत. आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत, तर ते भगवान रामाचे भक्त आहेत. प्रभु राम श्रीमंतांचा, तर भगवान शिव गरिबांचा देव आहे, असे विधान  तेलंगाणातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी येथील एका कार्यक्रमात केले. मुख्यमंत्री रेड्डी यांनी उत्तर आणि दक्षिणेतील राजकीय आणि धार्मिक विचारसरणीशी तुलना केली. रेड्डी यांच्या या वक्तव्यावर भाजपने टीका करत निषेध नोंदवला आहे. राजकीय लाभासाठी रेड्डी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपने केला.

उत्तर आणि दक्षिण भारताच्या राजकीय संस्कृतीत भेद असल्याचेही मुख्यमंत्री रेड्डी यांनी या वेळी नमूद केले. रेड्डी यांनी मतदारसंघ फेररचना सूत्रावरून चिंता व्यक्त केली. लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवणे यामुळे दक्षिणेतील राजकीय बळावर परिणाम करणारे ठरेल, असेही रेड्डी म्हणाले.

आर्य-द्रविड सिद्धांत चुकीचा असल्याने तो कधीच नाकारण्यात आला आहे. तरीही काँग्रेसवाले त्याचा वापर करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

राजकीय लाभासाठी अशा प्रकारचे संतापजनक विधान करून रेवंत रेड्डी धर्मद्रोह करत आहेत. हिंदूंनी त्यांना यावरून वैधमार्गाने जाब विचारून क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

Read more on Anti Hindus

Latest News