-
केंद्र सरकारच्या तक्रार निवारण अपीलीय समितीचा युट्यूबला निर्देश
-
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्या लढ्याचा परिणाम !
-
गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका !

नवी देहली – माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या तक्रार निवारण अपीलीय समितीने यु ट्यूबर (स्वतःच्या यू ट्यूब वाहिनीद्वारे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती) ध्रुव राठी याच्या हिंदु देवतांवर आधारित वादग्रस्त व्हिडिओवर बंदी घातली असून यू ट्यूबला २४ घंट्यांच्या आत तो हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या व्हिडिओमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे समितीचे मत आहे.
🚨 BREAKING: Government of India Orders Immediate Takedown of Dhruv Rathee’s (@dhruv_rathee) Video.
The Grievance Appellate Committee (GAC), Ministry of Electronics & IT, Government of India, has passed an Order dated 15 July 2026 (Appeal No. 8321/2026) directing YouTube to… pic.twitter.com/hP4rpGmLVC
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) July 19, 2026
१. ध्रुव राठी याचा ‘काय हिंदु गोमांस खाऊ शकतात? : केरल स्टोरी २ चा पर्दाफाश’ या शीर्षकाचा २१ मिनिटांचा व्हिडिओ २१ मार्च २०२६ या दिवशी त्याच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. हा व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आणि ४ लाखांहून अधिक लोकांनी तो आवडल्याचे सांगितले.
२. ‘द केरल स्टोरी २’ या चित्रपटावर भाष्य करतांना राठी याने या व्हिडिओमध्ये हिंदूंच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर भाष्य केले. गोमांस सेवनाशी जोडलेली संवेदनशीलता बाजूला ठेवून त्याने भारतातील सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक धारणा यांवर चर्चा केली. प्राचीन ग्रंथ, शास्त्रे आणि आधुनिक सर्वेक्षण यांचा संदर्भ देत राठी याने दावा केला की, रामायण आणि महाभारत यांतील पात्रे त्यांच्या वनवासाच्या काळात हरणाच्या मांसासह इतर मांस अन् मद्य यांचे सेवन करत असत. यात त्याने प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांचे नाव घेतले.
३. या व्हिडिओच्या विरोधात अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी २२ मार्च २०२६ या दिवशी नवी देहली येथील ‘सायबर क्राईम सेल’मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर २३ मार्च या दिवशी यूट्यूबच्या तक्रार अधिकार्याकडे रीतसर तक्रार नोंदवण्यात आली.
४. यूट्यूबने या व्हिडिओविषयी अधिक माहिती मागवली आणि पुनरावलोकन केल्यानंतर २५ मार्च रोजी ही तक्रार फेटाळून लावली. हा मजकूर स्थानिक कायद्यांचे किंवा त्यांच्या सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत नसल्याचे यूट्यूबने म्हटले. तसेच तक्रारदाराला सल्ला दिला की, जर हा व्हिडिओ भारतीय कायद्याचे उल्लंघन करतो, असे वाटत असेल, तर त्यांनी तो ‘ब्लॉक’ करावा किंवा न्यायालयाचे साहाय्य घ्यावे.
५. यानंतर अधिवक्त्या सचदेवा यांनी २७ मार्च २०२६ या दिवशी तक्रार निवारण अपीलीय समितीकडे अपील प्रविष्ट केले. २ मासांपेक्षा अधिक काळ हे अपील प्रलंबित राहिले. त्यानंतर त्यांनी रिट याचिकेद्वारे देहली उच्च न्यायालयात धाव घेतली. ३ जुलै २०२६ या दिवशी न्यायालयाने अपीलीय प्राधिकरणाला या प्रकरणावर जलद निर्णय घेण्याचे, तसेच आदेशाची प्रत १५ दिवसांच्या आत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.
६. समितीने धार्मिक भावनांशी जोडलेल्या प्रकरणांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा युक्तीवाद फेटाळून लावत यूट्यूबला व्हिडिओ हटवण्यास सांगितले. समितीचे म्हणणे आहे की, या व्हिडिओच्या पडताळणीवरून असे दिसून येते की, यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, जे संपूर्ण समाजासाठीही चांगले संकेत नाहीत.
७. राठीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी अधिवक्त्या सचदेवा यांनी साकेतच्या दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली असून ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. याची पुढील सुनावणी १० सप्टेंबर २०२६ या दिवशी होणार आहे.
अशा प्रकरणांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा
अधिवक्त्या सचदेवा यांनी सामाजिक माध्यमांवर हा आदेश प्रसारित करत याला योग्य दिशेने उचललेले पाऊल म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, निर्मितीच्या नावाखाली श्रद्धेची चेष्टा केली जाऊ शकत नाही. न्याय टप्प्याटप्प्याने मिळत आहे. वास्तविक अशा प्रकरणांचा निपटारा तातडीने व्हायला हवा; कारण जोपर्यंत यावर चर्चा होते, तोपर्यंत लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि याच्या निर्मात्यांनाही ‘वादग्रस्त व्हिडिओ बनवा आणि अधिकाधिक दर्शक मिळवा’, नेमके हेच हवे असते.
४ जुलै
यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या ! – देहली उच्च न्यायालय
-
देहली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश
-
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्या याचिकेवर दिला आदेश

नवी देहली – यू ट्यूबर ध्रुव राठी याने हिंदूंच्या देवतांविषयी प्रसारित केलेला व्हिडिओ हटवला जावा कि नाही, यावर पुढील १५ दिवसांत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या तक्रार अपीलीय समितीला दिले आहेत. या व्हिडिओद्वारे मानहानी केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
The Hon’ble Delhi High Court today directed the Grievance Appellate Committee to decide our appeal and granted us the liberty to approach the Hon’ble Court again in the event our grievance remains unresolved.
The writ petition sought a direction to the Grievance Appellate… pic.twitter.com/U0JoZBnr7q
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) July 3, 2026
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी प्रविष्ट केलेल्या अपीलावर हा निर्णय देण्यात आला. अधिवक्त्या सचदेवा यांनी राठीच्या व्हिडिओच्या विरोधात फौजदारी गुन्हाही प्रविष्ट केला आहे.
हिंदूंच्या देवतांचा अवमान सहन केला जाणार नाही ! – केंद्र सरकार
केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा न्यायालयात म्हणाले की, या व्हिडिओमध्ये हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने आहेत आणि ती सहन केली जाऊ शकत नाहीत. एकतर मध्यस्थाने स्वतःहून हा व्हिडिओ हटवला पाहिजे किंवा तसे करण्यासाठी न्यायालयीन आदेश प्रसारित केला पाहिजे.
व्हिडिओमध्ये नक्की काय आहे ?
ध्रुव राठीच्या २१ मार्च या दिवशीच्या एका व्हिडिओवर सचदेवा यांनी आक्षेप घेतला आहे. या व्हिडिओचे शीर्षक ‘कॅन हिंदूज इट बीफ ? केरला स्टोरी २ एक्सपोस्ड’ असे आहे. या व्हिडिओमध्ये राठीने हिंदु धर्मग्रंथांमधील खाण्यापिण्याच्या सवयींवर चर्चा केली आहे. प्राचीन ग्रंथ आणि ऋषीमुनी यांनी प्रभु राम आणि प्रभु कृष्ण यांसारख्या देवतांच्या मांसाहाराचा उल्लेख केल्याचा युक्तीवाद त्याने या व्हिडिओत केला आहे.







