पुस्तकात आतंकवादी मकबूल भट याचा ‘शहीद’, तर फुटीरतावाद्यांचा ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून उल्लेख

श्रीनगर (काश्मीर) – राज्यातील परिस्थिती सामान्य असल्याचा दावा एकीकडे सरकार करत असतांनाच दुसरीकडे मात्र येथील नव्या पिढीला हिंसाचाराचे धडे दिले जात असल्याचे उघड झाले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सर्वसमावेशक शिक्षण धोरणाच्या अंतर्गत शाळांच्या ग्रंथांलयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘ग्रेट अँड लेजेंडरी पर्सनॅलिटीज ऑफ जम्मू अँड काश्मीर’ नावाच्या पुस्तकात आतंकवादी मकबूल भट याचे ‘शहीद’, तर फुटीरतावाद्यांचे ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून उदात्तीकरण करण्यात आले आहे. हे पुस्तक ‘ओबेरॉय बुक्स सर्व्हिसेस‘या खासगी प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून ते हिलाल अहमद आणि संतोष मीना यांनी लिहिले आहे.
जम्मू-कश्मीर के सरकारी स्कूलों में आतंकियों को शहीद बताने वाली किताब पर विवाद#JammuKashmir #MaqboolBhat@ShivangiiD pic.twitter.com/On6Pg2OOsf
— News18 India (@News18India) July 5, 2026
१. ‘जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरम’ने हे पुस्तक सार्वजनिक करून राज्य सरकारच्या हेतूंविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली.
२. ‘जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरम’चे उपाध्यक्ष रघु मेहता आणि विश्वस्त दीपक कपूर यांनी सांगितले की, या पुस्तकात आतंकवादी मकबूल भट याला ‘शहीद-ए-आझम’ आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी, शब्बीर अहमद शाह, मसरत आलम आणि मौलवी फारूक यांना ‘काश्मीरचे स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून चित्रित केले आहे.
३. राज्य सरकारने ‘समग्र शिक्षा योजने’अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी हे पुस्तक खरेदी केले आणि राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून दिले.
Maqbool Bhat – Terrorist
Shabir Shah – Separatist
Abdul Gani Lone – Separatist
Masarat – Stone Pelter
Hashim Qureshi – Terrorist
Mirwazi Maulvi – Separatist
Sayed Ali Shah Geelani – Hurriyat Separatist.But according to Academic Book of J&K they are Personalities and Legend… pic.twitter.com/Dj61tJ6OkW
— Ashish K 🇮🇳 (@KpNationalist) July 4, 2026
४. या पुस्तकात मकबूल भट याच्यावर आधारित एका प्रकरणात भारताला ‘आक्रमक’ म्हणून चित्रित करण्यात आले आहे. यासह मकबूल याने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिल्याचे म्हटले आहे.
५. प्रत्यक्षात मकबूलला गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कलीन पोलीस अधिकारी अमर चंद आणि भारतीय राजदूत यांच्या हत्येप्रकरणी ११ फेब्रुवारी १९८४ या दिवशी फाशी देण्यात आली आहे.
यावरून ‘काश्मीरमध्ये कलम ३७० जरी हटले असले, तरी नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आणि प्रशासन यांची आतंकवादी अन् फुटीरतावादी यांचे उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती हटली नाही’, हे स्पष्ट होते. अशांच्या राजवटीत काश्मीरमध्ये पुन्हा आतंकवाद आणि फुटीरतावाद फोफावल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







