
विरार (पालघर) – विरार येथे धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्नेह’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरार येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी परिवारासह उपस्थित होते. धर्मशिक्षणवर्गाच्या आयोजनाचा उद्देश श्री. राज जाधव यांनी स्पष्ट केला.
#विरार (पश्चिम) येथे @HinduJagrutiOrg वतीने धर्मप्रेमींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न!
कार्यक्रमात धर्मशिक्षण, साधनेचे महत्त्व, हिंदू धर्मावर होणारे आघात यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ३० धर्मप्रेमी उपस्थित होते.@SG_HJS pic.twitter.com/VlQ8xlbwXK— HJS Mumbai (@HJSMumbai) June 22, 2026
या वेळी श्री. बळवंत पाठक यांनी समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सविस्तर परिचय उपस्थित धर्मप्रेमींना करून दिला.या वेळी त्यांनी अष्टांग साधनेचे महत्त्व आणि समष्टी साधना कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी सप्ताहातून एक दिवस बैठकीस येण्याची सिद्धता दर्शवली.






