Menu Close

शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे पार पडले प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

मार्गदर्शन करताना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील रुस्तमपूर भागातील मधुर शहनाई हॉलमध्ये प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशन आयोजन समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या या अधिवेशनात १६० हून अधिक हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर गोहत्या आणि धर्मांतरावर बंदी घालणारे कायदे करण्यासह ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वेळी गोरखपूर येथे अधिवक्त्यांची परिषद आणि चर्चासत्रे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवक्ता शेष नारायण पांडे, अधिवक्त्या लक्ष्मी शंकर शुक्ला, अधिवक्ता शैलेंद्र बहादूर सिंग, अधिवक्ता आशुतोष पांडे आणि इतर अनेक हिंदुत्वनिष्ठ यांनी अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Latest News