‘कॉर्पोरेट जिहाद’ची समस्या संपवण्यासाठी हिंदु युवतींना शत्रूबोध करून द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

चिपळूण – आज ‘कॉर्पोरेट जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या समस्या का घडत आहेत ? याचे मूळ सर्वधर्मसमभाव यात आहे. आजही कित्येक हिंदु कुटुंबियांना या समस्येविषयी ठाऊक नाही. ‘आपली सुशिक्षित मुलगी सर्वच दृष्टीने सक्षम आहे’, या भ्रमात राहून ते त्यांना मोकळीक देतात आणि शत्रूबोध नसणार्या या हिंदु युवती सहजपणे ‘लव्ह जिहादी’ मानसिकता असणार्यांच्या षड्यंत्राला फसतात. ‘द केरळ फाइल्स’ असे दोन चित्रपट आले; परंतु त्यातून हिंदूंनी काहीही बोध घेतलेला दिसत नाही. खरेतर या हिंदूबहुल देशाचे, येथील संस्कृतीचे, येथील धर्म परंपरेचे शत्रू असणार्यांना आपण ओळखत नाही; म्हणून ‘लव्ह जिहाद’सारखी समस्या आज निर्माण झाली आहे.
हिंदु पालकांनी त्यांच्या युवतींना हा शत्रूबोध करून दिला की, कॉर्पोरेट जिहादची समस्याच संपेल, असे परखड निवेदन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. चिपळूण येथे ८ जून या दिवशी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ‘कॉर्पोरेट जिहाद नक्की सत्य काय ?’, या विषयावर विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत आणि चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक तथा पाणी सभापती निहार कोवळे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण आणि लोटे या भागांतील हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल अर्थव्यवस्था’ या विषयांवरील पुस्तकांचे कक्ष मांडण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यावर अनेक हिंदु बांधवांनी या अभियानात ते कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात, याविषयी वक्त्यांशी चर्चा केली. या आयोजनात अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे साधक सहभागी होते.
हिंदु युवतींनी सतर्क रहावे ! – अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत
ग्रामीण भागांतील हिंदु मुली जेव्हा नोकरीसाठी शहरात जातात, तेव्हा तेथील सर्व परिस्थिती त्यांच्याकरता नवी असते. अशा मुलींवर ही जिहादी टोळकी लक्ष ठेवून असतात आणि तिच्याशी संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात अन् ती युवती त्यात फसते. त्यामुळे हिंदु युवतींनी सतर्क रहाणे महत्त्वाचे आहे.
आतातरी हिंदु समाजाने संघटित व्हावे ! – नगरसेवक निहार कोवळे
‘लव्ह जिहाद’चा विषय हा केवळ मोठ्या आस्थापनांमध्ये नसून तो चिपळूणसारख्या ग्रामीण आणि शहरी भागांतही चालू आहे. आज हिंदु समाज या समस्येच्या विरोधात एकवटला नाही, तर भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतातरी हिंदूंनी एक व्हावे.







