शास्त्र धर्म प्रचार सभेचे साप्ताहिक ‘ट्रुथ’ आणि ‘भारतजीर’ यांचा ९४ वा वर्धापनदिन सोहळा साजरा !

कोलकाता (बंगाल) – महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये नुकत्याच एका बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान (आयटी) आस्थापनेतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ उघडकीस आला. अशा प्रकारचा जिहाद भारतातील कोणत्याही शहरात किंवा ‘कॉर्पोरेट’ आस्थापनेत घडू शकतो. त्यामुळे ज्यांना त्यांची मुले मोठ्या आस्थापनांमध्ये कामाला आहेत आणि ती स्थिरावली आहेत, असे वाटत असेल, तर त्यांचा हा समज खोटा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना या वास्तवाची जाणीव करून दिली पाहिजे, तसेच संघटित राहून अधिक जागरूकता निर्माण केली पाहिजे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी व्यक्त केले. शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारे ‘ट्रुथ’ आणि ‘भारतजीर’ या साप्ताहिकांच्या ९४ व्या वर्धापनदिनी व्यक्त केले.

‘ट्रुथ’ या इंग्रजी आणि ‘भारतजीर’ या बंगाली साप्ताहिकांचा ९४ वा वर्धापनदिन सोहळा शास्त्र धर्म प्रचार सभेच्या मुख्यालयात साजरा झाला. या सोहळ्याला हुगळी येथील पू. गौर महाराज, ‘ट्रुथ’चे संपादक पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसंपादक डॉ. कौशिकचंद्र मलिक, शास्त्र धर्म प्रचार सभेचे श्री. जयनारायण सेन, सोवन सेनगुप्ता, भारतीय साधक समाजचे संस्थापक श्री. अनिर्बान नियोगी, पंडित उपेंद्र मोहन यांसह अनेक साधक प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ माध्यमांतून सहभागी झाले होते.







