Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मशिक्षणवर्गांचे संमेलन झाले !

धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव (महाराष्ट्र) – येथील विखरण गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ धर्मशिक्षणवर्ग चालू झाले. तिन्ही वर्गांचे एकत्रीकरण करून संमेलन आयोजित करण्यात आले होते. वर्गात शिकवलेली सूत्रे कृतीमध्ये आणतांना आलेले अनुभव काही जिज्ञासूंनी सांगितले. समितीच्या धर्मशिक्षणवर्गाच्या उपक्रमसेविका कु. सायली पाटील यांनी काळानुसार साधना, गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे आणि व्यक्तीमत्त्व विकासाचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले.

समितीचे जिल्हा युवा संघटक श्री. निखिल कदम यांनीही कृतीशील राहून धर्माची सेवा कशी करू शकतो ? याचे मार्गदर्शन केले. समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा परिचय करून दिला. संमेलन यशस्वी करण्यासाठी श्री. प्रदीप कुंवर, श्री. जितेंद्र चौधरी, श्री. प्रकाश माळी, विखरण गावातील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन सेवा केली. अनेकांनी त्यांच्या गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

Latest News