-
धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहित यांच्यासाठी सदैव जागरूक रहा – साध्वी सरस्वती
-
मध्यप्रदेशाचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचीही उपस्थिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘धर्मरक्षक’ने येथे एका भव्य धर्मसभेचे आयोजन केले होते. हिंदु नववर्षाच्या निमित्ताने २२ मार्चला हा कार्यक्रम पार पडला. धर्मसभेच्या सांगतेनंतर ‘भगवा शौर्य पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेत सहस्रो ‘धर्मरक्षकां’नी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. यामुळे संपूर्ण भोपाळ शहर भगवेमय झाले होते, अशी माहिती ‘धर्मरक्षक’चे संस्थापक अध्यक्ष आणि युवा हिंदु नेते श्री. विनोद यादव यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. धर्मसभेच्या मुख्य वक्त्या साध्वी सरस्वती यांनी उपस्थितांना ओजस्वी संदेश देत म्हटले की, ‘धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहित यांच्यासाठी सदैव जागरूक रहा.’ मध्यप्रदेशाचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि ऊर्जामंत्री राकेश शुक्ला हेही या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

भोपाळमधील ‘छोला दसरा मैदाना’वर एका भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. धर्मसभेचे आयोजन करण्यासाठी कार्यक्रमाच्या स्थळी एका भव्य घुमटाकार मंडपाची उभारणी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी वाहतूक आणि व्यवस्थापन यांच्याशी संबंधित अडचणींचे कारण देत प्रशासनाने पदयात्रेची अनुमती तात्पुरती रहित केली होती. तथापि दुसर्या दिवशी सकाळीच ही अनुमती पुन्हा देण्यात आली. पदयात्रा अत्यंत सुव्यवस्थित आणि यशस्वीरित्या पार पडली.
🚩 Bhopal ignited in triumphant saffron during a grand Bhagwa Shaurya Padayatra, by Dharmarakshaks, with thousands marching vibrantly on the Hindu New Year. 🕉️
🪷 Led by Deputy CM Jagdish Devda, Energy Minister Rakesh Shukla, and Sadhvi Saraswati, Dharmapremi Hindus rallied for… https://t.co/tb4jznFC9X pic.twitter.com/58Tw956FJK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2026
अशी झाली ‘भगवा शौर्य पदयात्रा’ !![]() ‘भगवा शौर्य पदयात्रे’त सहभागी हिंदु जनसमुदायाच्या हाती भगवे ध्वज होते. सर्व जण विजयाच्या घोषणा देत होते. शहराच्या विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत या मिरवणुकीने सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि सनातन मूल्यांचा संदेश सर्वत्र पोचवला. पदयात्रेचा विस्तार प्रचंड असूनही संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि साधेपणाने पार पडला. विशेष म्हणजे यात ‘डीजे’ (डिस्क जॉकी, म्हणजेच अवाढव्य आवाज करणारी संगीत यंत्रणा चालवणारी व्यक्ती) किंवा मोठ्या आवाजातील संगीत यंत्रणांचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता. |
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात








