हिंदुहितासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, मंदिर विश्वस्त, अधिवक्ता, डॉक्टर, उद्योजक, प्राध्यापक, विचारवंत यांची वज्रमूठ !
मान्यवरांच्या हस्ते ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती’ या सनातन संस्थेच्या ग्रंथाचे ‘ॲमेझॉन’वरील ‘ई-बुक’चे प्रकाशन

मुंबई – बांगलादेशातील हिंदूंचे वंशविच्छेद, भारतातील हिंदूंवरील अत्याचार, देवतांचा अवमान, लव्ह जिहादचे संकट, धर्मांतर, गोहत्या आदी हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात संघटन आणि एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी मुंबई येथे २२ मार्च या दिवशी मुलुंड (पश्चिम) येथील पद्मावती बँक्वेट सभागृहात ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. ‘परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या अधिवेशनामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर, प्राध्यापक, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, गोरक्षक यांचा सहभाग होता.


या वेळी वैद्य उदय धुरी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटनाची आवश्यकता, हिंदु धर्मरक्षणाचे कार्य, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण, आपत्काळात करावयाची सिद्धता आदी विषयांवर विविध उद्बोधन सत्रांमध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रांत कार्य करतांना आलेले अनुभव या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले.
हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

आताच्या आधुनिक गणराज्यात कायदा सर्वांना समान सांगितला जातो. सध्याचे गणतंत्र देशभक्तांच्या अस्तित्वाच्या संरक्षणासाठी देशातील धर्मांध जिहाद्यांचा नाश करीत नाही उलट त्यांना संविधानिक अधिकार देतो, असे खेदाने म्हणावे लागत आहे. भारतात संविधान, गणतंत्र जर आहे तर काश्मीरमध्ये सर्व साडे सात लाख विस्थापित हिंदूंची घरवापसी झाली असती ! न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तर न्यायालय म्हणते इतकी जूनी गोष्ट आज का घेऊन येता ? तेच न्यायालय गांधी हत्या, शीख दंगे अशा केसेस आज देखील ऐकते ? त्यामुळे हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल. जातपात, पद, पक्ष, संघटना, प्रांत यांचे भेद विसरून आपल्याला संघटित व्हायला लागेल
संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केल्यास हिंदूंचा विजय निश्चित – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

जगात मुसलमानांची संख्या हिंदूंच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली, तर पुढील काही वर्षांत भारत जगातील सर्वाधिक मुसलमानांची लोकसंख्या असलेला देश होईल. सध्या चालू असलेल्या युद्धामध्ये भविष्यात भारत ओढला गेला, तर देशभरात गृहयुद्ध माजेल, दंगली भडकतील. ज्यामध्ये हिंदूंची हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हिंदूंनीही अधिक मुले जन्माला घालणे, हा त्यावरील उपाय नाही. संतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केल्यास विजय निश्चितच हिंदूंचा होईल. हिंदूंनी जात-पात, पक्ष-संघटना यांची बंधने बाजूला सारून धर्मकार्यासाठी संघटित व्हायला हवे. प्रतिदिन धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे आणि प्रत्येकाने प्रतिदिन साधनेचे प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन अभय वर्तक यांनी उद्घाटन सत्रात केले.

हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, ‘स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिला आहे. धर्मरक्षणाच्या निर्णायक लढ्यात सनदशीर मार्गाने आपणाला धर्माच्या बाजूने लढायचे आहे’.

प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ. अमित थडानी म्हणाले, ‘मागील ५० वर्षांत साम्यवाद्यांनी शिक्षण, चित्रपटसृष्टी या माध्यमातून साम्यवादाचा प्रपोगंडा निर्माण केला आणि केवळ स्वत:ची विचारधारा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी आपले विचार सर्वांपर्यंत पोचवत आपल्या संस्कृतीची ओळख विश्वाला करून देण्यासाठी आपण हिंदु धर्माचे ‘‘ब्रँड अम्बेसिडर’ व्हायला हवे’.

पाकिस्तानात प्रतिवर्षी अनुमाने 1 हजार मुलींचे बळजबरीने धर्मांतर आणि निकाह लावला जातो. तेथील पोलीस यंत्रणा, न्याययंत्रणा, राजकीय पुढारी या गोष्टींना संरक्षण आणि बळ देण्याचे काम करतात, हे भीषण वास्तव मानवाधिकार कार्यकर्ता आणि लघुचित्रपट निर्माता श्री. महेश वासू यांनी या अधिवेशनात मांडले.

प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ यु ट्यूबर श्री. सचिन गायकवाड यांनी ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि यश’ याविषयी मार्गदर्शन केले
असा झाला प्रारंभ !
१. प्रारंभी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले.
२. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा सामूहिक जप करण्यात आला.
३. श्री गणेशाचा श्लोक म्हणून आणि शंखनाद करून अधिवेशनाला प्रारंभ झाला.
४. पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी विश्वशांतीसाठी शांतिपाठ म्हटला.
वंदनीय उपस्थिती !
ह.भ.प. रामदास चौधरी महाराज, ह.भ.प. संतोष महाराज पवळे आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थित अधिवेशनाला लाभली.







