Menu Close

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. भव्या गौडा यांचा सत्कार

बेंगळुरू (कर्नाटक) मधील उल्लाळ येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. भव्या गौडा यांचा सत्कार !

बेंगळुरू (कर्नाटक) – ८ मार्च २०२६ या दिवशी बेंगळुरू येथील उल्लाळ उपनगरात ‘उपकार वेल्फेअर असोसिएशन, बेंगळुरू’ यांच्या वतीने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू जिल्हा समन्वयिका सौ. भव्या गौडा, ‘दर्पण वेल्नेस’च्या संस्थापिका सौ. नंदिनी शिवकुमार यांच्यासह १०० हून अधिक महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सौ. भव्या गौडा म्हणाल्या, ‘‘राजमाता जिजामातांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मातांनी मुलांना राष्ट्रभक्त म्हणून घडवले पाहिजे.’’

या कार्यक्रमामध्ये महिलांच्या भूमिकेचे महत्त्व विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. त्यासह भारतीय संस्कृती, कला आणि परंपरा यांचीही ओळख करून देण्यात आली. या वेळी समाजसेवा, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत सेवा देणार्‍या महिला उपस्थित होत्या.

Latest News