Menu Close

विलेपार्ले येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन !

स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन राष्ट्ररक्षणाचे दायित्व घेण्याचे आवाहन !

                                           प्रशिक्षण

मुंबई – समाजातील दुष्प्रवृत्ती, आतंकवादी आक्रमणे, युवतींवर वाढते अत्याचार यांमुळे स्वतः, कुटुंब यांसह समाजाचे रक्षण करणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे. यामुळे स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन युवक-युवतींनी राष्ट्ररक्षणाचे दायित्व घ्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा नेज्जुर यांनी विलेपार्ले येथील नवा समाज मंडळ पदवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयात समितीच्या वतीने स्वसंरक्षण उपक्रम राबवण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

महाविद्यालयीन युवक-युवतींसमवेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समितीच्या युवा संघटकांनी स्वसंरक्षणाची काही प्रात्यक्षिके दाखवली. या उपक्रमात महाविद्यालयातील एकूण पुष्कळ युवक-युवती यांचा सहभाग होता.

‘स्वसंरक्षणाची आवश्यकता या उपक्रमातून लक्षात आली’, असा अभिप्राय श्री. प्रतीक मोहिते यांनी दिला.

Latest News