Menu Close

स्वामी विवेकानंद यांचे विचार कृतीत आणून राष्ट्ररक्षणासाठी कार्यरत व्हा ! – सौ. धनश्री केळशीकर, हिंदु जनजागृती समिती

मुंबई – स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांचे कृतीत अनुकरण करून आता युवकांनी जागृत होऊन राष्ट्र, संस्कृती आणि धर्म रक्षणासाठी सदैव कार्यरत व्हायला हवे, असे विधान हिंदु जनजागृती समितीच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमालेत केले. वडाळा येथील ‘नॅशनल कन्नडा एज्युकेशन सोसायटी’च्या (एन्.के.इ.एस्.च्या) महाविद्यालयात  स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्या नेहा तिवारी आणि प्राध्यापक सुनील मांगले यांचा सक्रीय सहभाग लाभला.

बोलतांना सौ. धनश्री केळशीकर

Latest News