Menu Close

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेचे यश : पन्हाळा प्रांताधिकार्‍यांचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश !

हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानाचे यश !

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी पन्हाळा यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची नोंद घेत पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी हिंदु जनजागृती समिती आणि श्री. आनंदराव काशीद यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांसह सर्व संबंधित अधिकारी यांना ‘स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा’, असे पत्र पाठवले होते. याच समवेत पन्हाळा गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांनीही समितीच्या निवेदनाची नोंद घेत पन्हाळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना ‘हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या जनजागृतीस योग्य ते सहकार्य करावे’, असे पत्र पाठवले आहे.

पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगशिं टे यांनी काढलेले प्रशासकीय पत्रक
पन्हाळा गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांनी काढलेले प्रशासकीय पत्रक

Latest News