स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळांमध्ये क्रांतीकारकांची माहिती देणार्या फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शाळेतील विद्यार्थी आणि जनतेने घेतला.
१. सोलापूर



मुख्याध्यापिका सौ. वैशाली कुंभार म्हणाल्या की, असे उपक्रम राबवणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. आजची युवा पिढी आणि मुले यांच्या मध्ये राष्ट्रप्रेम आणि क्रांतीकारक यांविषयी जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवत आहे.
शाळेच्या वतीने मुलांना त्यांना आवडणार्या कोणत्याही ४ क्रांतीकारकांची माहिती एकत्रित करून वहीत लिहून त्याचा अभ्यास करण्याचा उपक्रमही देण्यात आला.
२. चंद्रपुर








