Menu Close

‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’च्या वतीने धर्मकार्य करणार्‍यांचा सत्कार !

श्री. किरण दुसे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. मोहनअण्णा शिंदे (डावीकडे)

यळगूड (जिल्हा कोल्हापूर) – ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’च्या वतीने हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍या धर्मविरांचा २२ जून या दिवशी बीरदेव मंदिरासमोरील झुंझार हॉल येथे सत्कार करण्यात आला. यात हुपरी येथील अवैध मदरशाच्या विरोधात यशस्वी लढा देणारे हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, हिंदु धर्म प्रवर्तक श्री. अभिमन्यू भोसले, श्री. शांताराम सोळवंडे, विश्व हिंदु परिषदेचे संपर्क प्रमुख श्री. मुकुंद उरुणकर यांचा समावेश होता.

या प्रसंगी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’चे संस्थापक श्री. नितीन चौगुले, सांगली जिल्हाप्रमुख श्री. मोहनअण्णा शिंदे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्री. संभाजी बन्ने, कोकण विभागप्रमुख श्री. निळकंठ माने यांसह सर्वश्री सुभाष गोट खिंडे, प्रकाश लोहार, तानाजी किल्लेदार, सनी हनबर, युवा सहकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. नितीन काकडे (डावीकडून दुसरे) यांचा सत्कार करतांना श्री. नितीन चौगुलै (उजवीकडे), तसेच श्री. निळकंठ माने (डावीकडे)

या प्रसंगी श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘हुपरी येथील लढ्यात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सहकार्य लाभले. या लढ्याला ईश्वरी अधिष्ठान असल्याने यश लाभले.’’ श्री. नितीन काकडे म्हणाले, ‘‘गेली ८ वर्षे सातत्याने हा लढा चालू होता. प्रामाणिकपणे हिंदुत्वाचे कार्य करत असल्याने श्रीकृष्णाच्या कृपेने या लढ्याला यश मिळाले. यापुढील काळातही हिंदुत्वाच्या कार्यात सक्रीय असेन.’’ या प्रसंगी श्री. नितीन चौगुले यांनी हिंदु धर्मावर होणारे आघात, त्या निमित्ताने संघटनेचे होणारे उपक्रम यांची माहिती देऊन दैनिक ‘सनातन प्रभात’ करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म कार्याचे कौतुक केले.

Latest News