
वाराणसी – येथील जैतपुरा भागातील ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’कडून १ ते ९ जून या कालावधीत श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्मासाठी निःस्वार्थ भावाने कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनातन योद्धा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे वाराणसी येथील श्री. राजन केसरी यांना जगद्गुरु पातालपुरी पीठाधीश्वर अनंत श्री विभूषित श्रीमद्जगद्गुरु नरहर्यानंद द्वाराचार्य श्री बालकदेवाचार्य महाराज (काशी) यांच्या हस्ते ‘सनातन योद्धा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. राजन केसरी यांनी हा पुरस्कार मिळाल्याविषयी समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
या श्रीरामकथेच्या उद्घाटनाच्या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी उपस्थित श्रद्धाळूंना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’, तसेच ‘जीवनात साधना आणि धर्माचरण यांची अपरिहार्यता’, यांविषयी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार जायसवाल, मुख्य सचिव श्री. राजेश सेठ, कोषाध्यक्ष श्री. जयशंकर प्रसाद गुप्ता, पूजा सचिव श्री. रवि प्रकाश जायसवाल आणि अन्य नागरिक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.







