उपस्थित राष्ट्रप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्रस्थापनेची शपथ !

मुंबई – सर्वत्रच्या हिंदूंनी विजयादशमी उत्साहात साजरी केली. प्रथेनुसार या दिवशी ठिकठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत शस्त्रपूजन करण्यात आले. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शपथ घेण्यात आली.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबईत भांडुप शिवनेरी कंपाऊंड येथील हनुमान मंदिर; पालघर (वसई) येथील सदिच्छा सेवा मंडळ आणि श्री परशुराम तपोवन आश्रम; ठाणे येथील उमा-नीळकंठ मारुति मंदिर आणि संतोषीमाता मंदिर येथे शस्त्रपूजन करण्यात आले. रायगडमध्ये खोपोली येथे खिडूकपाडा, चिंचवली शेकिन हनुमान मंदिर; मूळगाव, तसेच काटरंग गाव येथील एकविरा आई मित्रमंडळ; पनवेल येथील पोदी हनुमान मंदिर, पाली येथील परळी, अलीबाग येथील बेलोशी, उसर आणि वर्हाड पाली या ठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले.
सर्व ठिकाणी स्थानिक धर्मप्रेमी, धर्मशिक्षणवर्गातील युवक-युवती, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह एकूण ३०० अधिक जण उपस्थित होते.
कौतुक
ठाणे येथील संतोषीमाता मंदिराचे श्री. विष्णु सुंभे आणि सौ. आशा सुंभे यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यात अशा उपक्रमांसाठी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. आणि सौ. सुंभे यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले.










