शिक्षकांनो, तणावमुक्त अध्यापन करून सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करा !

दिशाहीन झालेली राष्ट्राची सध्याची पिढी

‘सध्या आपल्या राष्ट्राची नवीन पिढी नीतीमत्ताहीन झालीआहे. मुलांचे वर्तन अयोग्य होत आहे. मुले ‘कार्टून’सारख्या विकृत कार्यक्रमांच्या आहारी जात आहेत. मुलांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा राहिलेली नाही. ज्या राष्ट्राच्या राष्ट्रप्रेमी पिढी सिद्ध होत नाही, तेशिक्षणच नव्हे. ‘मी आणि माझे’ अशा संकुचित मानसिकतेची पिढी निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण देणे गरजेचे असणे

शिक्षकांनो, आपण विद्यार्थ्यांना जेशिक्षण देतो, त्यातून जर स्वार्थी पिढी निर्माण होत असेल, तर आपल्या राष्ट्राचा विनाश अटळच आहे.विद्यार्थ्यांचे मन व्यापक होईल, असे शिक्षण सध्या दिले जात नाही. ही स्थिती जर पालटली नाही, तर राष्ट्र संपेलआणि पर्यायाने आपणही संपू.

शिक्षकांचे महत्त्व

समाजातील एकच घटक ही सर्व स्थिती पालटू शकतो. तो घटक म्हणजे शिक्षक.राष्ट्राचे खरे सेनापती शिक्षकच आहेत; पण एखाद्या राष्ट्राचा सेनापती संपला, तर राष्ट्र दिशाहीन होते. मित्रांनो,समाजाची एकंदर स्थिती आणि घरच्या समस्या पाहून आपल्यालाही अस्वस्थ वाटते. मनावर ताण येतो. ‘हीस्थिती पालटणार नाही’, असे म्हणून आपण अस्वस्थ होतो.

शिक्षक तणावमुक्त राहिल्यासच चांगली पिढी निर्माण होणार असणे

या सर्व तणावातून आपणमुक्त व्हायला हवे. जर शिक्षक तणावमुक्त नसतील, तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे या सर्वप्रक्रियेत शिक्षकाने आनंदी राहिले पाहिजे. शिक्षक आनंदी असतील, तर मुले आनंदी आणि पर्यायाने राष्ट्र आनंदीहोते. असे झाल्यास आपण तणावमुक्त आणि आत्मविश्वासक असलेली पिढी राष्ट्राला देऊन राष्ट्राचे रक्षण करूशकतो.

शिक्षकांनो, तणावमुक्त अध्यापन कसे कराल ?

तणावमुक्त होण्यासाठी खालील सूत्रांचा वापर आपण आपल्या अध्यापनात करायला हवा. ही सर्व सूत्रेकृतीत कशी आणू शकतो, ते पाहूया.

नकारात्मक बोलू नये : वर्गात प्रवेश केल्यानंतर शिक्षकाच्या तोंडात एकही नकारात्मक शब्द नसावा.काही शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांला म्हणतात, ‘तुझा काही उपयोग नाही. तू काहीच कामाचा नाहीस. तू आई -बाबांना त्रासच देण्यासाठी आला आहेस. तुझ्यामुळे पूर्ण वर्गाला त्रास होतो.’ ही वाक्ये मुलाच्या अंतर्मनालाजखमा करणारी आहेत. असे बोलल्याने स्वतःच्या मनावरही ताण येतो. बिंब-प्रतिबिंब या तत्त्वाप्रमाणे त्याविध्यार्थ्यालाजेवढे दुःख होते, त्यापेक्षा आपल्याला अधिक होते. ‘या तणावाचे मूळ माझ्यातच आहे; कारण मीनकारात्मक बोललो. माझ्यातील नकारात्मक विचारांनी मला स्वतःला दुःखी केले, म्हणजे मला सततसकारात्मकच बोलता यायला हवे’, असा विचार प्रत्येकाने करायला हवा.

तुलना करू नका : काही शिक्षक मुलांमध्ये तुलना करतात, उदा. आपण अभ्यासामध्ये कच्च्याअसणार्‍या विद्यार्थ्यांला सांगतो, ‘बघ, तो कसा अभ्यास करतो. तुला का जमत नाही ?’, अशी तुलना करण्यापेक्षा जो विद्यार्थी अभ्यास करतो, त्याचे कौतुक करावे आणि तो अभ्यास कसा करतो, ते सांगावे. जी मुले अभ्यासकरत नाहीत, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांना त्यावरील उपाय सांगावा.

शिकण्याच्या भूमिकेत रहा : जो सतत शिकण्याच्या भूमिकेत असतो, तोच शिक्षक होय. आपणशिकण्याच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्यांना विषय शिकवायला हवा.

विद्यार्थ्यांसोबत अधिकारवाणीने बोलणे टाळा : आपण एखाद्या विद्यार्थ्यांला अधिकारावाणीनेसांगतो, ‘मी शिक्षक आहे.’ एखादी गोष्ट आपण मुलांना प्रेमाने सांगितली, तर प्रथम आपल्याला आनंद मिळतो.त्यामुळे शिक्षकांच्या बोलण्यात अधिकारवाणी नकोच.

विद्यार्थ्यांचे मित्र होऊन त्यांना शिकवा : आपण मुलांशी मित्र म्हणून नव्हे, तर शिक्षक म्हणून संवादसाधतो. त्यामुळे अध्यापन करतांना आपल्या मनावर पुष्कळ ताण येतो. पाचवीतील विद्यार्थ्यांना शिकवतअसतांना शिक्षकाने मनातून पाचवीतील विद्यार्थ्यांएवढे होऊन शिकवले, तर त्यांना आनंद मिळेल.

विद्यार्थ्यांचे आई-बाबा होऊन त्यांना शिकवा : माझ्या घरातील मुलांविषयी प्रेम वाटून ‘ती चांगली शिकली पाहिजेत, असे मला वाटते. त्याच प्रेमाने जर आपण विद्यार्थ्यांना शिकवत असू, तर शिक्षकांच्या मुखावरआनंद दिसून ते तणावमुक्तच रहातील. घरची मुले अतिशय प्रिय आणि शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र केवळ नोकरी म्हणून शिकवायचे, अशी मानसिकता असेल, तर शिक्षकाला तणावमुक्त अध्यापन जमणार नाही. ज्या राष्ट्रात शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची आई होतील, त्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास होणारच आहे.

विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करू नका : एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना १० गणिते सोडवून आणण्यास सांगितली. ती त्यांनी सोडवून न आणल्यास काही वेळा ते त्यांना मोठ्याने ओरडतात किंवा मारतात. या कृतीतप्रथम शिक्षकाच्या मनावर ताण येतो. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना शांतपणे समजून घेतले पाहिजे आणि गणिते सोडवण्याचे उपाय सांगितले पाहिजेत. अपेक्षा असणारा शिक्षक शाळेत अथवा स्वतःच्या कुटुंबातही सर्वत्र तणावात वावरत असतो. आपल्याला अपेक्षाविरहित अध्यापन करायला हवे.

कर्तेपणा स्वत:कडे घेऊ नका : जे शिक्षक कर्तेपणा स्वतःकडे घेतो, ते सतत तणावातच रहातात.आपणाला जर तणावमुक्त अध्यापन करायचे असेल, तर प्रत्येक कृती झाल्यावर आपण ती देवाला अर्पण केली पाहिजे. असे केल्याने कोणतीही कृती केल्याचा मनावर ताण रहात नाही.

स्वत:च्या मनाचा अभ्यास करा : एखाद्या वर्गातील विद्यार्थ्यांचा शिक्षकाला काही वेळा राग येतो;कारण ती मुले अभ्यासच करत नाहीत. ‘मुले अभ्यास करत नाहीत; म्हणून राग येतो’, असे नसून राग हा स्वतःतील स्वभावदोषच आहे. वर्गातील विद्यार्थी पालटले, तर मी आनंदी होईन, असा विचार करू नये. ‘जेव्हा‘राग येणे’ हा स्वभावदोष जाईल, तेव्हाच मी तणावमुक्त होऊन मला आनंद मिळेल’, असा विचार करावा.

स्वत:च्या स्वभावदोषांचा अभ्यास करा आणि मुलांचे गुण पहा : इतरांच्या दोषांचे चिंतन केल्यास आपण कधीच तणावमुक्त होणार नाही; कारण तसे केल्याने मनावर पुष्कळ ताण येतो. त्यापेक्षा इतरांच्या गुणांचे चिंतन केल्यास आपल्याला आनंद मिळतो. आपण शाळेत गेल्यावर विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकयांचे गुण पहावेत. स्वतःचे स्वभावदोष ओळखून त्यांचा अभ्यास करावा. ते दूर केल्यास आपण तणावमुक्त होऊ.

स्वतःमध्ये पालट करा : आपण व्यक्ती आणि त्यांच्या प्रकृती यांमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करूनये; कारण ते आपल्या हातात नाही, उदा. शाळेतील मुख्याध्यापक विचित्र वागत असतील किंवा रागावून बोलतअसतील, तर त्यांच्यात पालट करणे आपल्या हातात नाही. मला स्वतःमध्ये पालट करून त्यांच्या प्रकृतीशी जुळवून घेता यायला हवे. तसे केले नाही, तर आपले कौटुंबिक जीवन आणि अध्यापन यांवर त्याचा परिणाम होईल अन् आपण सतत तणावात राहू.

सतत वर्तमानकाळात रहा : घरात घडलेल्या प्रसंगांचे विचार मनात ठेवून शिक्षक वर्गात गेल्यास ते व्यवस्थितपणे शिकवूच शकणार नाहीत. त्यांना वाटते की, आपण शिकवतो; पण मुले ऐकत नाहीत. शिक्षकाने सतत वर्तमानकाळातच रहायला शिकले पाहिजे, तरच आपले अध्यापन तणावमुक्त होऊ शकते.

वरील सर्व सूत्रे ऐकल्यावर आपल्याला वाटत असेल, ‘आपण हे सर्व कसे कृतीत आणणार ?’ यासाठी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण आहे. त्यांनी भवानीमातेची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपणही आपल्या कुलदेवतेचा नामजप केला, तर हे सर्व शक्य आहे. नामाने वाल्याचा वाल्मिकी झाला. नामजपाने विकारांवरही आपल्याला ताबा मिळवता येतो. स्वभावदोष आणि अहं -निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. हे करून स्वतःत पालट केल्यास आपण तणावमुक्त अध्यापन करू शकतो.’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल

Leave a Comment