पूर्वी काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥
ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥
संत मुक्ताबाईचे अभंग : १
संत सावतामाळींचे अभंग : १
संत सावतामाळींचे अभंग : २
ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : १
ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २
श्री रामाचे अभंग : १