शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं ।
पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥ १ ॥
कैसागे माये हा तारकु दिवटा ।
पंढरी वैकुंठा प्रगटला ॥ २ ॥
न कळे याची गती आदि मध्य अंती ।
जेथें श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥ ३ ॥
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम ।
शून्याहि शून्य समशेजबाजे ॥ ४ ॥
संत मुक्ताबाईचे अभंग : २
संत सावतामाळींचे अभंग : १
संत सावतामाळींचे अभंग : २
ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : १
ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २
श्री रामाचे अभंग : १