संत जनाबाईचे अभंग : २

झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥

पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥

ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥

जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥