संस्कृत सुभाषिते : १२

श्रुत्वा सागरबन्धनं दशशिराः सर्वैर्मुखैरेकदा तूर्णं पृच्छति वार्तिकान्सचकितो भीत्वा परं संभ्रमात् |
बद्धः सत्यमपांनिधिर्जलनिधिः कीलालधिस्तोयधिः पाथोधिजलधिर्पंयोधिरुदधिर्वारांनिधिर्वारिधिः ||

अर्थ :समुद्राला सेतू [पूल] बांधला हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या, ]घाबरलेल्या] दहा मुखे असलेल्या [रावणाने] गडबडीने हेरांना सर्वच [दहाही] तोंडानी विचारले, खरोखरीच सागराला [समुद्रवाचक दहा शब्द] बांधले काय ?

प्रहेलिका
वरील श्लोकामधिल समुद्राची १० नावे सांगा.


न मातरि न दारेषु न सोदर्ये न चात्मनि |
विश्वासस्तादृशः पुंसां यादृङ्मित्रे स्वभावजे ||

अर्थ :आपल्या खऱ्या मित्रावर माणसांचा इतका विश्वास असतो की तेवढा आईवर, पत्नीवर, सख्ख्या भावावर इतकाच काय खुद्द स्वतःवरही नसतो.वरं वनं वरं भैक्ष्यं वरं भारोप जीवनम् |
पुंसां विवेकहीनानां सेवया न धनार्जनम् ||

अर्थ :अविचारी माणसांची नोकरी करून पैसे मिळवण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं परवडलं, भीक मागितलेली परवडली किंवा ओझी वाहिलेली पत्करली.शीतलादिव संत्रस्तं प्रावृषेण्यान्नभस्वनः |
नभो बभार नीरन्ध्रं जीमूतकुलकम्बलम् ||

अर्थ :जणू काही थंडीने कुडकुडल्यामुळे आणि पावसामुळे आकाशाने अजिबात भोके नसलेले, भरपूर ढगांचे बनवलेले कांबळे पाघारले आहे.

[कवीला मळभ असलेले आकाश हे घोंगडी पंघारल्या प्रमाणे वाटते आहे.]वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः तृणं च शय्या न च राजयोगी |
सुवर्णकायो न च हेमधातुः पुंसश्च नाम्ना न च राजपुत्रः ||

अर्थ :झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षि नाही. गवताची गादी वापरतो तापसी नाही. पिवळा धमक आहे पण सोन नाही. पुल्लिंगी आहे पण राजकुमार नाही.

प्रहेलिका


पर्वताग्रे रथो याति भूमौ तिष्ठति सारथिः |
वायुवेगेन चलति पदमेकं न गच्छति ||

अर्थ :रथ वाऱ्याच्या गतीने पर्वताच्या शिखरावर जातो. सारथी मात्र जमिनीवरच असतो. तो एक पाउल सुध्धा न हलता रथ वायुवेगानी कसा जातो ?

प्रहेलिका


कार्यापेक्षी नरः प्रायः प्रीतिमाविष्करोत्यलम् |
लोभार्थी शौण्डिकः शष्पैर्मेषं पुष्णाति पेशलैः ||

अर्थ :माणसे काहीतरी काम करून घ्यायचं असलं की [खूप] पुळका दाखवतात. बोकडाला चांगलं गवत घालून त्याची जोपासना खाटिक करतो, ते त्याला कापल्यावर भरपूर मास मिळाव म्हणून नाही का?विधाय वैरं सामर्षे नरोऽरौ य उदासते |
प्रक्षिप्योदर्चिषं कक्षे शेरते तेऽभिमारुतम् ||

अर्थ :रागावलेल्या शत्रुशी वैर करून जो माणूस नुसता बसून राहतो, तो वाळलेल्या गवताला आग लावून वारा ज्या दिशेने वाहतो तिथे झोपून राहतो.नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता |
अमुखी कुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ||

अर्थ :नर आणि मादी यांच्यापासून जन्म झाला असला तरी ती स्त्रीला शरीर नाही, तोंड नसूनही ती आवाज करते आणि जन्मल्यावर लगेच नाश पावते. अशी ती कोण?

प्रहेलिकासर्वस्वापहरो न तस्करगणो रक्षो न रक्ताशनः सर्पो नैव बिलेशयोऽखिलनिशाचारी न भूतोऽपि च |
अन्तर्धानपटुर्न सिद्धपुरुषो नाप्याशुगो मारुतस्तीक्ष्णास्यो न तु सायकस्तमिह ये जानन्ति ते पण्डिताः ||

अर्थ :सर्वस्वापहर आहे, पण चोरांची टोळी नाही. रक्त पितो, पण राक्षस नाही. बिळात राहतो, पण साप नाही. सगळी रात्र भटकतो, पण भूत नाही. पटकन अदृश्य होतो, पण सिद्ध पुरुष नाही. वेगात धावतो, पण वारा नाही. चावा तीक्ष्ण आहे, पण बाण नाही. ओळखतील ते ज्ञानी..:)

प्रहेलिका