बालपणीही धर्माची लाज राखणारे लाला लजपतराय !

lala_lajpat_rai१. हिंदु धर्म अशिक्षित आणि निरक्षर धर्म असल्याची निश्‍चिती पटल्याने लाला लजपतराय यांच्या वडिलांनी मुसलमान धर्म स्वीकारण्याचे ठरवणे, मशिदीत जातांना बाळरूपी लाला लजपतरायांनी रडून विरोध करणे, चिकित्सालयात नेल्यावर बाळ आपोआप शांत होणे अन् त्यानंतर वडिलांनी मुसलमान धर्म स्वीकारणे स्थगित करणे :

आर्य समाजाचे थोर नेते पंजाबकेसरी लाला लजपतराय यांचे चरित्र वाचून आपल्या संस्कृतीवर झालेले आक्रमण किती भयंकर होते, याची कल्पना करू शकतो. लाला लजपतराय यांचे वडील शिक्षक होते. हिंदु धर्मातील त्रुटी (मानसिक स्थिरतेचा विघात करणारी वृत्ती) पाहून हिंदु धर्म अशिक्षित आणि अडाणी धर्म असल्याची धारणा त्यांच्या मनात पक्की झाल्याने ते मुसलमान बनण्यास सिद्ध झाले. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मशिदीच्या पायर्‍या चढत असतांना मागे त्यांची पत्नी छोट्या बाळाला कडेेवर घेऊन रडत रडत पतीला मागे फिरण्यासाठी आणि मुस्लिम धर्म न स्वीकारण्यासाठी विनवण्या करत होती; पण लाला लजपतराय यांच्या वडिलांनी मुसलमान धर्म स्वीकारण्याचा निर्णय निश्‍चित केला होता. त्याच वेळी त्यांच्या पत्नीच्या कडेवर असलेले बाळ इतक्या मोठ्याने रडायला लागले की, आता त्याचे प्राण जातील कि काय, असे वाटू लागलेे. लाला लजपतराय यांच्या वडिलांना मशिदीत घेऊन जाणार्‍या मुसलमानाने सांगितले, प्रथम मुलाला वैद्याकडे घेऊन जा. त्याच्यावर उपचार करा आणि नंतर मशिदीत या. बाळाला वैद्याकडे घेऊन गेेल्यावर ते लगेच गप्प झाले. त्याला काहीही झाले नसल्याचे वैद्यांनी सांगितले. त्यानंतर लाला लजपतराय यांच्या वडिलांचे मुसलमान धर्म स्वीकारणे स्थगित झाले.

२. मुलाने धर्माची लाज राखल्याने त्याचे नाव लाजपतराय ठेवणेे आणि नंतर ते आर्य समाज अन् भारत देश यांचा थोर नेता होणे :

बाळाच्या नामकरण विधीच्या वेळी आईने बाळाचे नाव लाजपतराय ठेवण्यास सांगितले. पंजाबमध्ये पत या शब्दाचा अर्थ धर्म असा आहे. बाळाने धर्माची लाज राखली; म्हणून त्याचे नाव लाजपतराय ठेवले आणि मोठा झाल्यावर हाच मुलगा आर्य समाज आणि भारत देश यांचा थोर नेता बनला.
– श्री. सत्यव्रत सामवेदी (संंदर्भ : आर्यनीती, २५.११.२०११)

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment