डॉ. हेडगेवार यांच्यातील राष्ट्राभिमान दर्शवणारा प्रसंग !

इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरीया हिच्या वाढदिवसाची बर्फी फेकून देणा-या केशवच्या राष्ट्राभिमानाचा आदर्श ठेवा !

हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या काळातील ही गोष्ट आहे. एकदा नागपूर येथील एका शाळेमध्ये शिक्षक मुलांना बर्फी वाटत होते. त्या बर्फीतला एक तुकडा केशवलाही मिळाला. त्याने विचारले, ‘‘ही बर्फी कशासाठी वाटली जात आहे ?’’

शिक्षक म्हणाले, ‘‘इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरीया हिचा आज वाढदिवस आहे.’’

हे ऐकताक्षणीच ११ वर्षांच्या केशवने तो बर्फीचा तुकडा फेकून दिला आणि म्हणाला, ‘‘महाराणी व्हिक्टोरीया इंग्रजांची राणी आहे. इंग्रजांनी आम्हाला दास (गुलाम) बनवले आहे. दास बनवणा-यांच्या वाढदिवसाचा आनंद आम्ही का साजरा करायचा ? आम्ही आनंदोत्सव तेव्हा साजरा करू, जेव्हा आम्ही आमच्या हिंदुस्थानला स्वतंत्र करू.’’

राष्ट्राभिमान नसानसात भरलेला हा शाळकरी मुलगा केशव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार होय !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, दोष घालवा आणि गुण जोपासा (प्रकरण २ : गुण का आणि कसे जोपासावेत ?)

Leave a Comment