देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !

एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, ‘जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ? जर मी तेथे असतो, तर मी अशी निंद्य घटना होऊ दिली नसती. देवीमातेच्या रक्षणार्थ मी माझ्या प्राणाची आहुती दिली असती !’ या प्रसंगातून स्वामीजींचे देवी भगवतीवरचेे प्रेम दिसून येते !

मुलांनो, देवळे ही ईश्‍वरी चैतन्याचा पुरवठा करणारी स्थाने आहेत. त्यांचे पावित्र्य राखा, तसेच ती भ्रष्ट होऊ देऊ नका !

देशासाठी शपथपूर्वक प्राणाचे बलीदान करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !

२३ ऑक्टोबर १९४३ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशात स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थान सरकार’चा शपथविधी पार पडला.

या सरकारचा पंतप्रधान या नात्याने नेताजींनी शपथ घेतली. ते उद्गारले, ‘‘ईश्‍वराला साक्षी ठेवून मी शपथ घेतो की, हिंदुस्थान, तसेच हिंदुस्थानचे माझे अडतीस कोटी बांधव यांना स्वतंत्र करण्यासाठी मी हा स्वातंत्र्यलढा माझ्या अखेरच्या श्‍वासापर्यंत चालू ठेवीन. मी नेहमी हिंदुस्थानचा सेवकच राहीन आणि हिंदुस्थानातील माझ्या बंधु-भगिनींच्या हिताची काळजी वाहीन. माझे श्रेष्ठ कर्तव्यसुद्धा हेच असेल.

अनेक फुलेफुलती । फुलोनिया सुकोन जाती ।
कोणी त्यांची महती गणती । ठेविली असे?
परि जेगजेंद्रशुंडेनेउपटिले। श्रीहरीसाठी मेले।
कमलफूल तेअमर झाले। मोक्षदातेपावन ॥

         स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या काव्यपंक्ती नेताजींना तंतोतंत लागू पडतात !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’

‘बोधकथा’हा ग्रंथ ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment