
गणपतीपुळे
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा गणपती’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी पुळ्याच्या गणपती ही पश्र्चिमद्वार देवता मानतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी अप्पांनी नगारखान्याची व्यस्था केली. माधवराव पेशवे व रमाबाईंनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. – अशा अनेक नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.
या गावातील स्थानिक लोक घरोघरी स्वतंत्र गणपती बसवत नाहीत. सर्व जण एकत्र येऊन स्वयंभू गणेशाची पूजाअर्चा करून गणेशोत्सव साजरा करतात.
ज्या डोंगराला श्रीगणेश मानले जाते त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात. अगदी समुद्र किनार्यावरच हे मंदिर असल्यामुळे लाटांचा घनगंभीर आवाज, अथांग सागर, नजरेच्या टप्प्यात न मावणारा किनारा, अतिशय सुबक, रेखीव असे मंदिर आणि स्वयंभू श्रीगणेश असा विलक्षण अनुभव येथे मिळतो. संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालताना सागराची रूपे, कोकणातला निसर्ग अनुभवता येतो.
शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर
धनुषकोडी
उज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम !
ओडिशा राज्यातील हिंदु संस्कृतीचा अद्भुत वारसा : श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर !
कोणार्कचे सूर्यमंदिर
अमरनाथ