देववाणी संस्कृत

श्लोक अर्थासहित

१. नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।

विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ॥

अर्थ : हाती वीणा आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

२. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

अर्थ : वाईट मार्गाने आचरण करणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्यांची प्रभा लाभलेल्या हे देवा श्रीगणेशा माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पार पडू देत.

३. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥

अर्थ : भूतलावर अवतरित होऊन भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करणार्‍या, रामचंद्र, प्रजापती, रघुनाथ, नाथ, सीतापती रामश्रेष्ठाला मी वंदन करतो.

४.मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥

अर्थ : मनाप्रमाणे वेगाने धावणार्‍या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियांचे दमन केलेल्या, बुद्धिमंतांमध्ये सर्वांत श्रेष्ठ असलेल्या, वानरसेनेतील मुख्य, वायुपुत्र, श्रीरामदूत मारुतीला मी शरण आलो आहे.

५. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥

अर्थ : वसुदेवपुत्र कृष्णाला , सर्व दु:ख हरण करणार्‍या परमात्म्याला , शरणागतांचे क्लेश दूर करणार्‍या गोविंदाला नमस्कार असो.

६. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

अर्थ : गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो.

७. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ : सर्व मंगलमय गोष्टींतील मांगल्यरूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणार्‍या, शरणागतांस आश्रय देणार्‍या, त्रिनयने, गौरी, नारायणी तुला नमस्कार असो.

८. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥

अर्थ : शरण आलेल्या दीन दुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणार्‍या हे देवी नारायणी (दुर्गे) तुला माझा नमस्कार असो.

९. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।

अर्थ : अखंडमंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी (आम्हाला) त्यांच्या चरणांशी घेतले त्या श्रीगुरूंना आमचा नमस्कार असो.

१०. नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे ।
चक्रे पुण्यं सरस्वत्या यो वर्षमिव भारतम् ॥

अर्थ : सर्वज्ञ, कवींमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या, आपल्या प्रतिभेने मेघवृष्टीसमान महाभारत नावाचे पुण्यदायी काव्य करणार्‍या भगवान श्रीवेदव्यासांना नमस्कार असो.


सुभाषिते अर्थासहित

१. विद्यारत्नं महद्धनम् ।

अर्थ : विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.

२. सा विद्या या विमुक्तये ।

अर्थ : मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.

३. सत्यं कण्ठस्य भूषणम् ।

अर्थ : सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.

४. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।

अर्थ : शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.

५. संघे शक्तिः कलौ युगे ।

अर्थ : कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.

६. आचार्यदेवो भव ।

अर्थ : आचार्यांमध्ये देव पहा.

७. मातृदेवो भव ।

अर्थ : मातेला देवाप्रमाणे पहा.

८. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।

अर्थ : आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.

९. गुरुशुश्रूषया विद्या ।

अर्थ : विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.

१०. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् |

अर्थ : या जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.

Leave a Comment