निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने मायेतील अडचणी दूर करणे

        ‘श्रीकृष्णाला भेटण्याकरिता सुदामा गेला. सुदाम्याच्या बायकोने संपत्ती मागण्यासाठी सुदाम्याला सांगितले होते; परंतु सुदाम्याने काही मागितले नाही. सुदाम्याला पहाताच त्या प्रेमभेटीने श्रीकृष्णाचे डोळे पाणावले होते. ते आनंदाश्रू होते. खरा मित्र कधीही मागत नसतो आणि आपण जर मागितले, तर भगवंताला दुःख होईल; म्हणून सुदामा गप्प राहिला. सुदामा घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी आला होता. त्याने मूठभर पोहे भगवंताला दिले. ‘ते पोहे भगवंताने खावे’, अशी सुदाम्याची इच्छा होती; कारण त्या पोह्यात त्याचे सर्वस्व सामावले होते. भगवंत प्रथम सर्वस्व घेतो आणि नंतर सर्वस्व देतो. भगवंताने सुदामा घरी पोहोचण्यापूर्वी त्याचे घरदार सोन्याचे करून सर्व संपत्ती त्याला दिली.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)