संस्कृतचे महत्त्व जाणून त्याचा लाभ करून घेणारे विदेशी !

अ. २६.४.२००७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे ग्रीस या देशी गेले होते. तेथील एका स्वागत-समारंभात ग्रीसचे राष्ट्रपती कार्लोस पाम्पाडलीस यांनी ‘राष्ट्रपतिमहाभाग ! सुस्वागतं यवनदेशे !’, या संस्कृत वाक्याने आपल्या भाषणाचा प्रारंभ केला. आपल्या भाषणात त्यांनी संस्कृत ही प्राचीन भारताची भाषा असून या भाषेचा संबंध ग्रीक भाषेशीही असल्याचे सांगितले.

आ. जुलै २००७ मध्ये ‘अमेरिकी सिनेट’चा प्रारंभ वैदिक प्रार्थनेने झाला. गेल्या २१८ वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ही गोष्ट घडली. ‘ॐ शांतिः शांतिः शांतिः ।’ अशी संस्कृतमधील प्रार्थना म्हणून संस्कृतला ‘मृतभाषा’ म्हणणार्‍या नेहरू-गांधी कुटुंबाला अमेरिकी सिनेटने चपराकच लगावली आहे.

इ. अमेरिकन विद्यापिठांतही संस्कृतचे अध्ययन आणि अध्यापन गेली अनेक वर्षे चालू आहे. तेथील कॅलीफोर्निया विद्यापिठात १८९७ सालापासूनच संस्कृत शिकवले जात आहे.

ई. २७ ऑगस्ट २००७ पासून चालू होणार्‍या वॅâलीफोर्निया सिनेटचा प्रारंभ संस्कृत मंत्रोच्चाराने झाला. नंतर न्यू जर्सी सिनेटचाही प्रारंभ संस्कृत मंत्रोच्चाराने झाला.

उ. मेरिलँड (अमेरिका) विद्यापिठातील विद्याथ्र्यांनी ‘संस्कृतभारती’ या नावाचा एक गट तयार केला असून त्यांनी एक संकेतस्थळही (www.speaksanskrit.org) चालू केले आहे.

ऊ. ११ एपिल २०१० या दिवशी अमेरिकेतील सेनेटचा प्रारंभ संस्कृत श्लोकपठणाने झाला.

जगातील सर्व उदात्त विचारांचा उगम संस्कृत भाषेत असून, संस्कृत ही अत्यंत परिपूर्ण, शास्त्रशुद्ध आणि हजारो वर्षे उलटली, तरी तशीच्या तशी जिवंत राहिलेली एकमेव भाषा !

– पाश्चात्त्य विद्वान आणि विद्यापिठांचे अभ्यासक

Leave a Comment