साने गुरुजी

साने गुरुजींचा जीवन परिचय

कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, १८९९ रोजी गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली.

गुरुजींचे वांगमय

गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. कलेकरिता कला या जीवनाकरिता कला अशी ध्येये डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपले वांगमय नटविले नाही तर स्वतः चे समाजाविषयीचे विचार व स्वतःला आलेला अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदय रीतीने वर्णन केले आहे. गुरुजींचे वांगमय सर्वांसाठी आबाळ वृद्धांसाठी आणि बालकांना त्या गोष्टी सांगितल्या. कुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. या विपुल वांगमयातील तेजस्वी रत्ने म्हणजे ‘ शामची आई’ व ‘शाम’ हि पुस्तके आहे.

आंतरभारती

गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतांनाच दिनांक ११ जून १९५० ला त्यांचे देहावसान झाले.

Facebooktwittergoogle_plusFacebooktwittergoogle_plus

Related Articles