पालकांनो, हे लक्षात घ्या !

आपल्या मुलांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी विदेशात पाठवून
त्यांची आणि स्वतःची जन्मोजन्मीची हानी करू नका !

१. मुलांची हानी

काही पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी विदेशात पाठवतात आणि अभिमानाने सांगतात, आमचा मुलगा अमेरिकेत आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, मुलाला विदेशात पाठवून ते त्याची अनेक जन्मांसाठी हानी करत आहेत. हानीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. भारताची कितीही अधोगती झालेली असली, तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत सात्त्विक आहे. त्यामुळे मुलगा विदेशात रहातो, म्हणजे तो असात्त्विक वातावरणात रहातो.

आ. असात्त्विक वातावरणामुळे त्याच्यावर अनेक चुकीचे संस्कार होतात.

इ. त्याला साधना म्हणजे काय ?, हेही कळत नाही. त्यामुळे साधना करून ईश्‍वरप्राप्ती करायची, हे जे मनुष्यजन्माचे ध्येय आहे, तेच त्याला ज्ञात होत नाही.

ई. मुलगा शिक्षण झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यामुळे तेथेच रहातो. विवाहानंतर त्याला होणारी मुले त्याच रज-तम प्रधान वातावरणात वाढतात. अशा तर्‍हेने अनेक पिढ्यांचे कायमची हानी होते.

उ. जन्मभूमीच्या संदर्भात आपले काही कर्तव्य आहे, हेही मुलांना न कळल्यामुळे त्या कर्तव्याचेही त्यांच्याकडून पालन होत नाही.

२. पालकांची हानी

जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. या सिद्धांतानुसार पालकांनाही मृत्यू येतो; पण विदेशात राहिलेल्या मुलांना श्राद्ध-पक्षाबद्दल काही ज्ञात नसल्याने, तसेच ते करण्याची काहीच सोय नसल्यामुळे श्राद्ध-पक्ष केले जात नाहीत. त्यामुळे पालकांना मृत्यूत्तर जीवनात श्राद्ध-पक्ष केल्याचा लाभ होत नाही आणि मुलेही आई-वडील आणि पितर यांच्या ऋणातून मुक्त होत नाहीत.

– प.पू. डॉ. जयंत आठवले (९.६.२०१४)

Leave a Comment