नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

स्वबांधवांप्रती अपार सहानुभूती बाळगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे राज्यकर्ते भारताला हवेत !

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचे शेकडो स्त्री-पुरुष सैनिक सुरक्षित जागेच्या शोधात होते. इंग्रजी सैन्य त्यांचा पाठलाग करत होते. अंधारी रात्र होती, पाऊस पडत होता अन् चिखलात पाय रुतत होते. नेताजींच्या पायाला चालून चालून फोड आले होते. ते थोडेसे लंगडत चालत होते. नेताजींची ती अवस्था पाहून एक जपानी अधिकारी म्हणाला, एक जीप आमच्याकडे आहे. आपण तिच्यात का नाही बसत ? सुभाषबाबू धन्यवाद देत म्हणाले, ‘ही माझी माझ्याबरोबरची मुलेबाळे पाहा ! त्यांना सोडून मी एकटा कसा येऊ ? माझे सैनिक हे मला माझ्या मुलांप्रमाणे आहेत. कोणता बाप मुलांना टाकून स्वत:चा जीव वाचवेल.’

संदर्भ : साप्ताहिक कडेलोट, दीपावली विशेषांक (४.११.२०१३)

Leave a Comment