अर्थशून्य नावे ठेवल्याने होणारा तोटा जाणा !

आजकाल अनेक पालक आपल्या मुला-मुलींची प्रयल, रूमीन, लविला, आशिता अशी अर्थशून्य नावे ठेवतात. काही पालक मुला-मुलींची नावे विकी, रीटा, डॉली इत्यादी आंग्लाळलेली ठेवतात.

अ. मुला-मुलींची अर्थशून्य नावे ठेवल्याने त्यांचा मुला-मुलींना आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही.

आ. आंग्लाळलेली नावे ठेवणे, हे एकप्रकारे पाश्चात्त्यांचे दास्यत्व (गुलामगिरी) स्वीकारल्यासारखे आहे. देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, तरी आपण अजूनही दास्यत्वातच रहाणार का ? आंग्लाळलेली नावे ठेवल्याने नकळत स्वकीय संस्कृतीचा विसर पडायला लागतो.

१. अध्यात्मशास्त्रानुसार नावे ठेवल्याने होणारा लाभ

अ. आध्यात्मिक नावाचा मुलांवर संस्कार होऊन मुलांची वृत्ती नावातील अर्थाप्रमाणे बनण्यास साहाय्य होणे : जेव्हा जेव्हा मूल त्याचे नाव ऐकते किंवा उच्चारते, त्या त्या प्रत्येक वेळी नावाचा मुलावर संस्कार होत असतो. यामुळे मुलाची वृत्ती नकळत नावातील अर्थाप्रमाणे बनण्यास साहाय्य होते. समजा, मुलाचे नाव ‘समर्पण’ असेल, तर त्याच्या मनात समर्पणाची (त्यागाची) भावना निर्माण होईल. समजा, मुलीचे नाव ‘अर्चना’ असेल, तर तिच्या मनात अर्चना (देवाची उपासना) करण्याचे विचार येतील.

आ. अध्यात्मातील नियमानुसार नावाशी संबंधित भाव किंवा स्पंदने मुलांमध्ये निर्माण होण्यास साहाय्य होणे : अध्यात्मातील एक नियम असा आहे – ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अन् त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात.’ समजा, एखाद्या मुलीचे नाव ‘आनंदी’ असले, तर वरील नियमानुसार त्या नावाशी जोडली गेलेली आनंदाची स्पंदने तिला लाभतील आणि तिची वृत्ती नेहमी आनंदी रहाण्यास साहाय्य होईल.

२. धर्मशास्त्रानुसार मुला-मुलीचे नाव किती अक्षरी असावे ?

अ. मुलाचे नाव सम अक्षरसंख्येचे, म्हणजे २-४-६ अक्षरी असावे.

आ. मुलीचे नाव विषम अक्षरसंख्येचे, म्हणजे ३-५-७ अक्षरी असावे.

३. काही आध्यात्मिक नावांची उदाहरणे

अ. मुलगे : गुरुदास, देवीदास, रामदास, समर्पण, प्रेमानंद, नित्यानंद, सदानंद, विनय आणि आनंद.

आ. मुली : अर्चना, आरती, प्रार्थना, साधना, नम्रता, नमिता, विनया, ऋजुता, सुविद्या, आनंदी, स्वानंदी आणि मोक्षदा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment