देशाची म्लेंच्छबाधा दूर करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

ज्याप्रमाणे भूतबाधा होते, अन्नातून विषबाधा होते, तशी या देशाला म्लेंच्छबाधा झाली आहे. ही बाधा नष्ट करायची असेल, तर प्रत्येक तरुणाने प्रखर धर्माभिमान आणि देशाभिमान चित्तात ठेवायला पाहिजे. त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करून संघटित आणि कृतीशील समाज निर्माण केला पाहिजे. Read more »

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे आवश्यक आहे. याकरिता शिवनीती आणि शिवप्रताप २४ घंटे आपल्या हृदयात जागृत ठेवायला हवा. Read more »

राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – मलकारी लवटे

हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. मलकारी लवटे यांनी केले. Read more »

कराड येथे नायब तहसीलदारांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने निवेदन

हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या विविध आघातांच्या संदर्भात येथील नायब तहसीलदार सौ. मीनल भामरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्र्यांकडे द्यावयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. Read more »

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !

देशभरात सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. धूम्रपान आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मिरज शहरात प्रांत कार्यालयात देण्यात आले. Read more »

अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !

कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते. Read more »

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन

टिपूच्या हातात सत्ता येताच त्याने मूळच्या हिंदु राजाचे नाव-गाव पुसून टाकले. म्हैसूर हे इस्लामी राज्य असल्याचे घोषित केले. सर्व हिंदु स्त्री-पुरुषांना मुसलमान धर्माची दिक्षा द्या, जे स्वेच्छेने मुसलमान धर्माचा स्वीकार करणार नाही, त्यांना बळजोरीने मुसलमान करा अथवा ठार मारा. Read more »

अवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

कोल्हापूर येथील संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात चार पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. Read more »

हिंदुद्वेषी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेस अनुमती देऊ नये आणि त्यांना सातारा जिल्हा प्रवेश बंदी करावी !

ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी ईश्‍वरपूर येथे, तसेच कराडमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमीन (एम्.आय्.एम्.) या पक्षाचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

पुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्याचार : धर्मांधाला अटक

कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर लग्नासाठी बळजोरी करत असे, तसेच रस्त्यात गाठून तिला मारहाणही करत असे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​