Menu Close

देशातील ७३ टक्के संपत्ती १ टक्का भारतियांकडे !

वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.

अफगाणिस्तानातील आतंकवादी आक्रमणात ५ ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ६ जण गंभीर घायाळ झाले. या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी हॉटेलमधील १०० हून अधिक जणांना ओलीस ठेवले होते.

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

हीथर नॉर्ट म्हणाल्या, आम्ही हाफिज सईदकडे एक आतंकवादी म्हणूनच पहातो. वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार होता.

अण्वस्त्र आक्रमण काय असते, ते भारताला दाखवून देऊ ! – पाकचे परराष्ट्रमंत्री असिफ ख्वाजा

ट्वीटमध्ये ख्वाजा म्हटले की, भारताच्या सैन्यप्रमुखांनी केलेले वक्तव्य अत्यंत दायित्वशून्य आहे. त्यांचे हे वक्तव्य आमच्या अण्वस्त्र आक्रमणांना दिलेले आमंत्रण आहे, असे वाटते.

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या, तर ३१ जणांचे अपहरण !

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने…

#ChappalChorPakistan : कुलभूषण जाधव प्रकरणी अमेरिकेत पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर निदर्शने

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शने केली.

पाकमध्ये २ हिंदु भावांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्‍वरी अशी त्यांची नावे…

पाकमधील बलात्कारपीडित हिंदु महिलेला पोलीस संरक्षण देण्याचा पाक न्यायालयाचा आदेश

येथील एक बलात्कारपीडित हिंदु महिला आणि तिचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. पाकमधील एका प्रभावशाली परिवारातील एका व्यक्तीने एका…

मी भारतात आलो, तर कट्टरतावादी मुल्ला आणि मौलवी यांना मक्केला पळून जावे लागेल ! – ऑस्ट्रेलियातील इमाम महंमद ताहिदी

ताहिदी हे धर्मांध मुसलमान, तसेच मुसलमान संघटना यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. आतंकवादी आक्रमण झाल्यास ते संबंधित भागातील इमामांना त्याचा दोष देतात.

सी.पी.ई.सी. योजनेत अफगाणिस्तानचा समावेश करत चीनकडून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

चीनची ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यास चीनला मध्य आणि पश्‍चिम आशियात सहज प्रवेश करता येणार आहे, तसेच या रस्त्यावर सर्वस्वी चीनचीच मक्तेदारी रहाणार आहे.