Menu Close

उत्तरप्रदेश : मुसलमान कर्मचार्‍याने हिंदु तरुणाच्या चेहर्‍यावर थुंकी लावून केले मर्दन !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे केशकर्तनालयात ‘थुंकी जिहाद’ !

धर्मांध मुसलमानांच्या अशा विकृतींवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक 


लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील एका केशकर्तनालयामध्ये हिंदु ग्राहकाच्या चेहर्‍याचे मर्दन (मसाज) करतांना कर्मचार्‍याने स्वतःची थुंकी वापरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी या केशकर्तनालयातील कर्मचारी झैद याला अटक करण्यात आली आहे. येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.

मर्दन करतांना ग्राहकाला त्याच्या चेहर्‍यावर काहीतरी विचित्र लावले जात असल्याचा संशय आला आणि त्याने सीसीटीव्ही चित्रण पहाण्याची विनंती केली. व्हिडिओमध्ये झैद नावाचा कर्मचारी मसाज करतांना ग्राहकाच्या चेहर्‍यावर थुंकी लावतांना आढळून आला.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात 

Related News