Menu Close

छत्तीसगड : राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन !

flex_pradarshan
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून प.पू. महामण्डलेश्‍वर आनंदधाम पीठाधीश्‍वर योगीराज स्वामी ज्ञानस्वरूपानंद अक्रियजी महाराज, श्री चक्रमहामेरु पीठाधीश्‍वर श्री श्री दण्डीस्वामी सच्चिदानंद तीर्थ महास्वामी, प.पू. श्रीरामबालकदासजी महाराज, श्री सिद्धेश्‍वरानंदजी महाराज, सनातनचे पू. चत्तरसिंह बाबूलालसिंह इंगळे (सर्वांत उजवीकडे)

राजिम (छत्तीसगड) : २ मार्च या दिवशी राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन प.पू. श्रीरामबालकदासजी महाराज (पाटेश्‍वरधाम), श्री सिद्धेश्‍वरानंदजी महाराज (पंचकोशी पीठाधीश्‍वर), श्री चक्रमहामेरु पीठाधीश्‍वर श्री श्री दण्डीस्वामी सच्चिदानंद तीर्थ महास्वामी (श्री चक्रमहामेरू पीठम्), महामण्डलेश्‍वर आनंदधाम पीठाधीश्‍वर योगीराज स्वामी ज्ञानस्वरूपानंद अक्रियजी महाराज (संस्थापक-अध्यक्ष आनंदधाम, अलख ज्ञान गोरक्षा समिती, जोधपूर, राजस्थान) आणि सनातनचे पू. चत्तरसिंह बाबूलालसिंह इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

उपस्थित सर्व संत प्रदर्शनाचे कौतुक करतांना म्हणाले, आपण हे अद्भूत कार्य करत आहात. या वेळी उपस्थित सर्व संतांचे भक्तगण, भाजपचे नयापारा-राजिमचे श्री. युधिष्ठीर चन्द्राकर आणि सनातन संस्थेचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदर्शन पहात असतांना प.पू. श्रीरामबालकदासजी महाराज हे अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी पुढील वर्षी पौष मासात असेच ५ दिवसांचे प्रदर्शन त्यांच्या गावी भरवण्याची सूचना केली. विवाह संदर्भातील फ्लेक्स पाहून महाराज म्हणाले की, या कार्यक्रमामध्ये आदर्श विवाहपद्धतीविषयी माहिती आहे. सनातनने सांगितल्याप्रमाणे सामूहिक विवाहचे आयोजनही करता येईल आणि शेवटी एक धर्मसभा घेता येईल. या आयोजनाची संपूर्ण सिद्धता करण्याचे दायित्व त्यांनी स्वतःवर घेतले. या संदर्भात मी पू. डॉ. चारूदत्त पिंगळे (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक) यांनाही सांगीन, असेही ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *