Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्‍या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले

शिक्षिका शेख आयशा परवीन (डावीकडे)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील सैदाबादमधील ‘सक्सेस, द स्कूल’ने शिक्षिका शेख आयशा परवीन हिच्यावर कडक कारवाई करत तिला तत्काळ नोकरीवरून काढून टाकले आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला या शिक्षिकेने ‘कलमा’ पाठ करण्याचा गृहपाठ दिल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने अंतर्गत चौकशी करून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शाळेने प्रसारित केलेल्या सेवा समाप्ती पत्रात केवळ नोकरीवरून काढल्याचा उल्लेख नसून भविष्यातही त्या शिक्षिकेला संस्थेच्या कोणत्याही शाळेत नोकरी न देण्याविषयी स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणावर भाजपने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमागे ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचा हात आहे, त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि या शाळेची मान्यता रहित करण्यात आली पाहिजे, अशी मागणी केली.

या कारवाईच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, शैक्षणिक परिसरात त्याच्या धोरणांच्या विरोधात जाणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

हिंदू जनजागृती समितीने टीव्ही शोवरील चर्चासत्रात या घटनेचा निषेध केला

हिंदू जनजागृती समितीचे तेलंगणा राज्य प्रवक्ते श्री. चेतन गाडी या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

Read more on Anti Hindus

Latest News