Menu Close

कलमापठण न केल्याने हिंदु सुरक्षारक्षकांवर चाकूने वार करणारा उच्चशिक्षित जिहादी अटकेत

आतंकवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता !

आरोपी जैब जुबैर अंसारी (उजवीकडे)

मुंबई – मीरारोड (पूर्व) भागामध्ये काम चालू असलेल्या एका इमारतीच्या सुरक्षारक्षकांना नाव आणि धर्म विचारून जैब जुबैर अंसारी नावाच्या मुसलमान युवकाने त्यांना कलमापठण करण्यास सांगितले. कलमापठण करता न आल्यामुळे जैब जुबैर अंसारी याने सुरक्षारक्षकांवर चाकूने वार केला. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे नयानगर या भाड्याच्या घरातून पोलिसांनी जैब जुबैर अंसारी याला अटक केली. २६ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. आक्रमणात राजकुमार मिश्रा हा सुरक्षारक्षक घायाळ झाला असून सुब्रतो सेन हा सुरक्षारक्षक पळून गेल्यामुळे तो वाचला.

जैब जुबैर अंसारी हा उच्चशिक्षित आहे. वर्ष २०१९ पर्यंत त्याने अमेरिकेत शिक्षण घेतले. भारतात आल्यावर त्याने रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि गणित यांचे शिकवणीवर्ग चालू केले. पोलिसांच्या अन्वेषणामध्ये जैब जुबैर अंसारी हा सामाजिक माध्यमांत सातत्याने ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचे व्हिडिओ पहात असल्याचे आढळून आले. त्यादृष्टीने आतंकवादविरोधी पथकाकडून अन्वेषण चालू आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Read more on Anti Hindus

Latest News